Maharashtra Weather News : महाराष्ट्रातून परतीच्या प्रवासाला निघालेला मान्सून सध्या धीम्या गतीनं माघार घेत असताना त्याची वाट मध्येच अडखळताना दिसली. ज्यामुळं पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसली. याच धर्तीवर पुढील 24 तासांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून (Konkan) कोकणाच्या दक्षिण भागामध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यासह वरील भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर उर्वरित राज्यात पावच्या हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या देशातील राजस्थान आणि गुजरातसह हरियाणाच्या काही भागांमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली असली तरीही इतर भागांमधून मात्र मान्सूनचा परतीचा प्रवास काहीसा गटांगळ्या खाताना दिसत आहे. हवामानाच्या या स्थितीमुळं मुंबई शहर आणि उपमगरांमध्ये आकाश निरभ्र राहील, तर काही भागांमध्ये पावसाची क्षणीक रिमझिम पाहायला मिळू शकते. ठाणे, पालघर आणि लगतच्या भागांमध्येही पावसानं विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळेल. 


भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवस राज्यात हलक्या पावसाची शक्यता असून, सप्टेंबर महिन्याचा शेवट जरी पावसानं होणार असला तरीही ऑक्टोबर महिन्याची सुरुवात मात्र पावसाच्या हजेरीनं होणार नाहीय. उलटपक्षी यादरम्यान निरभ्र आकाश आणि लख्ख सूर्यप्रकाश असं दिलासादायक चित्र पाहायला मिळेल. 


हेसुद्धा वाचा : खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट


 


राज्यातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह इतर किनारपट्टी भागामध्ये वातावरण अंशत: ढगाळ राहणार असून, इथं ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाके वाहतील, तर तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मेघगर्जना पाहायला मिळेल. या भागांमध्ये पावसाचा जोर मात्र वाढणार नाही. सध्या हवामानात कोणतेही मोठे आणि गंभीर बदल घडणार नसल्यामुळं राज्यात निवडक क्षेत्र वगळता बहुतांशी कोणताही अलर्ट लागू नाही.