खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट

 पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घटात स्टेड पुल बांधला जात आहे. दोन गजबजलेल्या शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Sep 29, 2024, 11:37 PM IST
खंडाळा घाटात 180 मीटर उंच स्टेड पुल; एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट title=

Mumbai Pune Expressway Missing Link : एक्सप्रेस-वे-मार्गे मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पासंदर्भात मोठी अपडेट सोमर आली आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत खंडाळा घाटात स्टेड पुल उभा राहिला आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाला आहे. लवकरच हा प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे मुंबई पुणे या  शहरातील अंतर 6 किमी ने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा जवळपास 30 मिनीटांचा वेळ वाचणार आहे. 

हे देखील वाचा... ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

या मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर 6 किमीनं कमी होणारेय तसंच प्रवाशांची लोणावळा घाटातूल वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन एमएसआरडीसी आहे. खोपोली एक्झिटपासून ते लोणावळ्याच्या कुसगावपर्यंत दोन्ही दिशेनं प्रत्येकी 4 मार्गिकांचे 2 बोगदे उभारण्यात येत आहेत. यातील सर्वांत मोठ्या बोगद्याची लांबी 8.87 किलोमीटर आहे. तर दुसरा बोगदा 1.67 किमी लांबीचा आहे. या दोन्ही बोगद्यांची 98 टक्के कामं पूर्ण झाले आहे. खंडाळा खोऱ्यात सुमारे 180 मीटर उंच केबल-स्टेड पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यामुळे अडचणी झाल्या होत्या.

मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प हा मुंबई पुणे या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली. मात्र हा मिसिंग लिंक पूर्णत्वाच्या जवळ आहे. एकूण 14 किलोमीटर चा असणाऱ्या या मिसिंग लिंकच्या खंडाळा येथील केबल स्टेड पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.  डिसेंबर 2024 ला प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होता. मात्र, मार्च 2025 पर्यंत हा मिसिंग लिंक खुला होऊ शकतो..