मुंबईत गारठा वाढला; नाशिकमध्ये 8.9 अंश सेल्सिअसची नोंद, महाराष्ट्राची काय स्थिती?
सध्या राज्यात थंडीची लाट पाहायला मिळते. मुंबईसह राज्यात इतर भागात तापमानात घट झाली असून नागरिक गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत.
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील तापमानात किमान घट झाली आहे. तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. तसेच मुंबईतही आता गारवा जाणवू लागला असून त्या पाठोपाठ नाशिक, माथेरान, महाबळेश्वरमध्ये तापमानाचा पारा 8 ते 10 अंश इतका खाली आला आहे. तसेच 29 नोव्हेंबरपासून बंगालच्या उपसागरात फेंगल या चक्रीवादळाची निर्मिती झाली आगे. यामुळे देशात दाट धुके पसरल्याच दिसत आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहे, हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
मुंबईत काय स्थिती?
बदलापूरमध्ये शनिवारी 11.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यंदाच्या मोसमातील महामुंबई परिसरातील आतापर्यंतचे हे सर्वांत कमी तापमान आहे. त्यापाठोपाठ कर्जतमध्ये 11.7 अंश तापमान नोंदवले गेले.
चक्रीवादळाचा काय परिणाम होणार?
तमिळनाडूच्या किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
मुंबईतील तापमान
बदलापूर
11.3
कर्जत
11.7
अंबरनाथ
12.3
पनवेल
12.6
उल्हासनगर
12.8
कल्याण
13.1
डोंबिवली
13.7
नाशिक
8.9
अहिल्यानगर
10.7
महाबळेश्वर
11.5
सातारा
11.9
जळगाव
11.9
मालेगाव
12.4
अकोला
12.7
नागपूर
13.6
सांगली
14.8
कोल्हापूर
16.7
सांताक्रूझ (मुंबई)
18
रत्नागिरी
18.6
दापोली
8.10
गारठा वाढल्याने विजेचा वापर कमी
गारठा वाढल्यामुळे एसी, पंखे, कुलरसाठी विजेचा होणारा वापर कमी झाला आहे. त्यामुळे शनिवारी मुंबईतील मागणी तीन हजार मेगावॉटवरून अडीच हजार मेगावॉटपर्यंत घटली आहे. उन्हाळ्यात तापमानाचा पारा चाळिशीपार गेल्याने 4200 मेगावॉट एवढ्या विक्रमी विजेची मागणी नोंदवली गेली होती. त्यानंतर पावसाळा आणि आता हिवाळ्यात या मागणीत घट होताना दिसत आहे. 2500 मेगावॉटची मागणी नोंद झाली आहे. टाटा पॉवरने 382 मेगावॉट, अदाणीच्या डहाणू वीज राज्यभरात 23 हजार मेगावॉट मागणी करण्यात आली आहे. मुंबईत थंडीमुळे विजेची मागणी घटली असली तरी राज्यभरात महावितरणकडे विजेची मोठी मागणी नोंदली गेली आहे. आज महावितरणकडे २३,००१ मेगावॉट एवढी मोठी मागणी नोंदवण्यात आली.