Maharashtra Weather News : वादळाचं सावट; 40-50 प्रतितास वेगानं वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार
Maharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा वाढलेला असतानाच काही भागांमध्ये मात्र पावसाची स्पष्ट चिन्हं दिसू लागली आहेत.
Maharashtra Weather News : राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक वातावरण दिसत असलं तरीही काही भागांमध्ये मात्र तापमान वाढ सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या भागांमध्ये हवामान विभागाकडून उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला असून, हवेतील दमटपणा वाढून त्यामुळं अडचणींमध्ये भर पडताना दिसणार आहे. तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरणामुळं चांगलीच कोंडी होताना दिसणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग साधारण 40 ते 50 किमी राहण्याचा अंदाज वर्तवत हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केलं आहे. विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
19 मे रोजी अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाची संभाव्य तारीख 22 मे असते. पण, यंदाच्या वर्षी मात्र तो तीन दिवस आधीच दाखल झाला आहे. अंदमान-निकोबारमधील या मान्सूनमुळं मुंबईमध्ये येत्या 24 तासांत जोरदार वा-यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पण हा मात्र पूर्वमोसमी पाऊस असेल. दरम्यान आता मान्सूनची पुढची वाटताल केरळ, कोकण आणि मुंबई असा होणार आहे.