Maharashtra Weather News : पुढील 4 दिवस पावसाचे! राज्याच्या कोणकोणत्या भागांना पाऊस झोडपणार?
Maharashtra Weather News : मुंबईसह रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.
Maharashtra Weather update : राज्यात मान्सूनच्या (Monsoon) आगमनानंतर जून महिन्यात हवी तशी वरुण राजाने हजेरी लावली नव्हती. पण गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढला असून जुलै महिन्याचा पहिला आठवड्यात सर्वत्र पाऊसच पाऊस असणार आहे. गेल्या 24 तासांपासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मध्यम पाऊस पाहिला मिळाला. हवामान विभागाने बुधवार पर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलीय. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 30 जून ते 3 जुलै या चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसंच विदर्भातही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. (maharashtra weather news update heavy rainfallt vidarbha konkan and mumbai till wednesday)
आजपासून पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी विदर्भात, तर राज्याच्या बहुतांश भागात 30 ते 2 जुलै दरम्यान बऱ्याच भागात पाऊस होणार आहे असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 30 जून आणि 1 जुलै दरम्यान रायगड, रत्नागिरी, पुणे तर 1 जुलैला सिंधुदुर्ग आणि 2 जुलैला पुण्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलीय. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्टची घोषणा हवामान विभागाने केलीय. तर 30 ते 3 जुलै दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना गर्जना विजांचा कडकडाट आणि ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
आज पालघर वगळता कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. आजपासून 3 जुलै दरम्यान पालघर ठाणे, सिंधुदुर्ग तर 1 ते 3 जुलै दरम्यान सातारासह नाशिक जिल्ह्यात घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असून या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.
मुंबई आणि पुणे शहर आज आणि उद्या आकाश सामान्यत: ढगाळ असणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. 1 जुलैनंतर आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह संततधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.