पहाटे आणि सायंकाळी वातावरणात असलेला गारवा आणि दुपारी उकाडा असा महाराष्ट्रातील सध्याच्या वातावरणाची स्थिती आहे. हवामान विभागाने पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता आहे. दाना चक्रीवादळाचा परिणाम मुंबई आणि महाराष्ट्रावर तेवढा झालेला नसल्याचे दिसून येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबर महिन्यात मागील दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी प्रथमच किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा 30 अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा उकाडा कायम आहे. पण ही घट गुलाबी थंडीची चाहुल तर नाही ना असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत आहे. 


(हे पण वाचा - लहान मुलांमध्ये पसरतोय 'हॅन्ड फूट माउथ डिसीज', लक्षणे आणि कारण जाणून घ्या?)


मुंबईत रात्री काहीसा गारवा आणि दिवसा उकाडा अशी स्थिती असून, किमान तापमानाचा पारा शनिवारी 21.4 अंश सेल्सिअसवर होता. ऑक्टोबर महिन्यात मागील दोन दिवसांच्या तुलनेत शनिवारी प्रथमच किमान तापमानात 3 अंश सेल्सिअसने घट झाली. मात्र, कमाल तापमानाचा पारा 30 अंशापेक्षा अधिक असल्याने दिवसा उकाडा कायम आहे.


 हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात 21.4अंश सेल्सिअस किमान, तर 35.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. कुलाबा केंद्रात किमान 25.5 अंश, तर कमाल 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ केंद्रांवरील किमान तापमान शुक्रवारपेक्षा 3 अंशाने कमी होते. दरम्यान, सध्या उत्तरेकडून वारे येत असल्याने किमान तापमानात घट होत आहे. दोन दिवसांनी पुन्हा किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.


(हे पण वाचा - Health Tips : ऑक्टोबर हिट आणि बदलत्या वातावरणाचा मुलांवर होतोय परिणाम, 5 टिप्सच्या मदतीने सांभाळा तब्बेत) 


ऑक्टोबर हीटने घाम काढल्यानंतर आता मुंबईकरांना थंडीची चाहूल लागली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत 21.4  तर कुलाबा येथे 25.5 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.


दिवाळीत कसं असेल वातावरण 


 रविवारी, सोमवारीही मुंबईचे किमान तापमान 21 अंश राहील. मुंबईत दोन दिवस आल्हाददायक वातावरण राहील. सोमवारी तापमानात वाढ अपेक्षित आहे. दिवाळीत सायंकाळी अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीत बाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडा. दिवाळी फटाक्यांमुळे होणार प्रदूषण आणि हवामानातील बदल यामुळे तब्बेतींची काळजी घेणं महत्त्वाचं ठरेल.