राज्यातील काही भागांमध्ये पाऊस तर काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पावसाचा देखील अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात तापमानाचा पारा हा  40 ते 42 डिग्री से. राहणार असल्याच सांगण्यात येत आहे. सरासरी कमाल तापमानापेक्षा 3 ते 4 डिग्रीने तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


इथे उन्हाचा तडाखा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी ठिकाणी तापमान वाढेल, असाही अंदाज दिलाय. तर अकोला, बुलडाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला. 


इथे पाऊस


धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती लातूर, धाराशिव,  संभाजीनगर, जालना जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला. उद्या म्हणजेच शनिवारी नाशिक, हिंगोली, धाराशिव, लातूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. 


उन्हांच्या झळांपासून अशी घ्या काळजी 


  • भरपूर पाणी प्या त्यामुळे डिहायड्रेशपासून बचाव होईल.

  • सुती , सैल, फिक्या रंगाचे कपडे घाला. त्यामुळे उष्णता जास्त शोषली जात नाही. ज्यामुळे उन्हाचा त्रास होणार नाही.

  • कडक उन्हात जाणे टाळा. दुपारच्या रणरणत्या उन्हात बाहेर पडू नका.

  • बाहेर जायची गरज असेलच तर डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री घ्या. शरीर पूर्णपणे झाका. पाण्याची बाटली आणि सनस्क्रीन नेहमी सोबत ठेवा.

  • बदलत्या वातावरणामुळे तब्बेतीत बिघाड होऊ शकतो, तो सांभाळा. 

  • काही ठिकाणी उन्हाळा आणि काही ठिकाणी पावसाळा असं महाराष्ट्राचं तापमान असल्यामुळे तब्बेतीची विशेष काळजी घ्या. 


देशभरात वातावरण


शनिवारी कमाल तापमान 37.8 अंश होते. ते सामान्यपेक्षा पाच अंशांनी अधिक होते. या संपूर्ण हंगामात आणि वर्षभरातील हा आतापर्यंतचा सर्वात उष्ण दिवस ठरला आहे. त्याच वेळी, किमान तापमान 20.5 अंश होते. हे सामान्यपेक्षा 2 अंश जास्त आहे. सकाळपासूनची आर्द्रता आणि उन्हाचा तडाखा यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास झाला. चारच्या सुमारास दाट काळे ढग दिसू लागले. असे असतानाही नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला नाही. हवेतील आर्द्रता 35 ते 79 टक्क्यांपर्यंत होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीत अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर होता. जाफरपूर, नजफगड, IGI विमानतळ, गुरुग्राम, मानेसर, सोनीपत, खारखेडा, फारुखनगर, पलवल, नोएडा, ग्रेटर नोएडा येथे जोरदार वादळ झाले. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही झाला. आज अंशत: ढगाळ वातावरण राहील. वादळाबाबत पिवळा इशारा देण्यात आला आहे.