Weather forecast Updates : उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही, तर आजपासून राज्यात काही भागात पावसाचा इशारा
Weather forecast Updates : होळीनंतर राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढत आहे. तरदुसरीकडे आसमानी संकट कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Weather forecast Updates in marathi : होळीनंतर राज्यातील तापमानात (Weather Updates) दिवसेंदिवस वाढ होतं आहे. उन्हाच्या तडाख्याने (Heat Wave) नागरिकांचे हाल होतं आहे. दुसरीकडे देशात H3N2 विषाणूचा वाढता (H3N2 Influenza) कहर वाढत चालला आहे. अशातच हवामान विभागाने (IMD) पुढील 72 तासांत या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीट आणि पाऊस (Rain forecast and Drought) पडण्याची शक्यता वर्तवली आहे. 15 ते 17 मार्चपर्यंत देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच येत्या तीन दिवसांत हवामानाचे अनेक रंग पाहायला मिळणार आहेत.
'या' राज्यात पावसाचा अंदाज (Rain)
हवामान विभागानुसार आज आणि उद्या म्हणजे रविवारी आणि सोमवारी जम्मू, काश्मीर, लडाखमध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. तर 13 आणि 14 तारखेला हिमाचल प्रदेश आणि 13 मार्चला राजस्थानमध्ये हवामान खराब असणार आहे. 13 आणि 14 तारखेला उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह अनेक भागात गारपीटसह पावसाची शक्यता आहे.
'या' राज्यांना इशारा
तर 12 ते 18 मार्चपर्यंत अनेक राज्यांमध्ये हवामान खराब असणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर कर्नाटकावर याचा परिणाम दिसून येणार आहे. तर 15 ते 16 मार्च दरम्यान मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. (maharashtra weather rain warning Weather forecast Updates Heat wave Mumbai maharashtra temperature imd alert in marathi)
मुंबईकरांच्या अंगाची लाही-लाही (Mumbai Heat Wave)
उन्हाच्या तडाख्यानं मुंबईकरांच्या (Mumbai news) अंगाची लाही-लाही केलीय... मुंबईत शनिवारी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद करण्यात आलीय.. शहर आणि उपनगरातला पारा तब्बल 38 अंशावर पोहोचला होता.. शनिवारी आलेली उष्णतेची लाट आजही मुंबईकरांना जाणवणार आहे.. तेव्हा दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडू नका.. तसंच उन्हापासून काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्यानं केलंय. (maharashtra weather)
शहरातील तापमान! (maharashtra temperature)
पुणे - 14.7 अंश सेल्सिअस
रत्नागिरी - 37.4 अंश सेल्सिअस
पणजी - 36.0 अंश सेल्सिअस
सोलापूर - 36.2 अंश सेल्सिअस
उस्मानाबाद - 35.3 अंश सेल्सिअस
परभणी - 35.0 अंश सेल्सिअस
यवतमाळ - 35.0 अंश सेल्सिअस
नांदेड - 35.02 अंश सेल्सिअस
अकोला - 36.02 अंश सेल्सिअस
अमरावती - 36.02 अंश सेल्सिअस
वाशीम- 36.02 अंश सेल्सिअस
ब्रह्मपुरी - 36.9 अंश सेल्सिअस
वर्धा - 35.4 अंश सेल्सिअस