Maharashtra Weather Update : राज्यातील वातावरणात क्षणाक्षणाला बदल होताना दिसत असून, उत्तरेकडे आलेली शीतलहर या वातावरणावर परिणाम करताना दिसत आहे. एकिककडे पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात आकाश निरभ्र झाल्यामुळं तापमानाच मोठ्या प्रमाणाच चढ- उतार पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती होताना दिसत आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरींची बरसात होऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या कोकण पट्ट्यासह सातारा आणि कोल्हापुरात आकाश निरभ्र राहणार असून, दुपारच्या वेळी सूर्याचा दाह अधिक सतावणार आहे. तर, पहाटेच्या वेळी मात्र तापमानातील घट वातावरणात गारवा आणणार आहे. दरम्यान, मुंबई आणि ठाण्यामध्ये मात्र उकाडा आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


राज्यातील कमाल तापमान सोलापुरात आढळलं असून, इथं पारा 37 अंशांच्याही पलिकडे पोहोचला होता. तर, नीचांकी तापमानाचा आकडा 9 अंशांपर्यंत राहिला. राज्याच्या उच्चांकी तापमानात पुढच्या 24 तासांमध्ये फारसा फरक पडणार नाहीये. दरम्यान, सातत्यानं होणाऱ्या या हवामान बदलांमुळं शेतपिकांवर आणि फळबागांवर परिणाम होताना दिसत आहेत. 


आंबा, काजू धोक्यात 


आंबा उत्पादन वाढीसाठी मोहोर अत्यंत महत्त्वाचा. यंदा डिसेंबर, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला थंड हवामान असल्याने मोहोर येण्यास सुरुवात झाली खरी पण त्यानंतर मात्र हवामान बदलांमुळं मोहोर झाडांवरून गळून पडताना दिसला. काजूच्या बाबतीतही असंच चित्र पाहायला मिळत असून, आता वातावरणानं साथ द्यावी अशीच इच्छा बागायतदार आणि शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत.