Maharashtra Weather : विदर्भ ओलाचिंब; देशातील तीन राज्यांना पावसाचा तडाखा, तर `या` भागांत येणार उष्णतेची लाट
Latest Weather Update : हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार वाढत्या तापमानापासून काही राज्यांना दिलासा मिळणार आहे. तर, देशातील काही राज्य मात्र याला अपवाद ठरणार आहेत. कारण, इथं उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे.
Latest Weather Update : (IMD) भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या वर्षी मार्च महिन्यापासूनच उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्यास सुरुवात होणार आहे. एका उच्चस्तरीय बैठकीमध्ये यंदाच्या उन्हाळ्याबाबतची चर्चा झाली. जिथं यंदाचा उन्हाळा आणखी वाढेल हे स्पष्ट करण्यात आलं. देशाच्या पूर्वोत्त भागात आणि पश्चिमेकडील भागामध्ये तापमान सामन्य आकड्याच्या वरत राहू शकतं. यासाठी आता राज्य प्रशासनांना याच धर्तीवर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update amid the risk of Heatwave stated getting ready to deal with climate rain predictions at some regions)
विदर्भ ओलाचिंब (Vidarbha Weather)
नागपुरात मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार इथं 15 ते 17 मार्च दरम्यान विदर्भात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. तसंच दक्षिण विदर्भात काही ठिकाणी गारपिटीची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. तिथे चंद्रपुरातही मुसळधार पावसाने हजेरी लावलीये. ढगांच्या गडगडाटासह चंद्रपुरात अवकाळी पाऊस बरसला. ज्यामुळं नागरिकांची धांदल उडाली. तर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कापूस, गहू यासह धान उघड्यावर साठवून ठेवलंय. त्यामुळे या पावसानं शेतकऱ्यांची चिंताही वाढली.
उन्हाळा आणखी वाढणार
वाढता उन्हाळा पाहता राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं तयारी करण्याचे निद्रेश हवामान विभागानं दिले आहेत. असं असतानाच स्कायमेटच्या (Skymet) माहितीनुसार पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या उत्तर भागासोबतच पश्चिम हिमालय, दक्षिण पश्चिम उत्तर प्रदेश या भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. बुधवार आणि गुरुवारच्या दरम्यान झारखंड, मध्य प्रदेश, केरळ, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेश येथे पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं या भागांना उष्णतेपासून (Heatwave) काहीसा दिलासाही मिळेल.
हेसुद्धा वाचा : RBI Restrictions । महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांवर आरबीआयचे आर्थिक निर्बंध
हवामान विभागाच्या माहितीनुसारही पश्चिमी झंझावातामुळं मंगळवारपासून देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. ज्यामुळं हिमालयीन क्षेत्र आणि काही मैदानी भागांना पाऊस झोडपण्याची शक्यता आहे. आसामच्या काही भागांमध्ये (Cyclone) चक्रीवादळसदृश परिस्थितीसुद्धा पाहायला मिळू शकते.