गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस सुरू आहे. चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होताना दिसत आहे. बंगाल उपसागरातील चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि केरळ येथे मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. या सगळ्याचा परिणाम हवामानावर होत असून मुंबई आणि उपनगरंमध्ये होताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याच्या तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे. तसेच कमाल तापमानाचा अंश देखील खाली आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या आणि मध्यम पावसाने हजेरी लावलेली आहे. 


राज्यात आज ढगाळ वातावरणासह कमाल तापमानात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. किमान तापमानात अंशतः घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 



पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे दबाव वाढला असून राज्यातील हवामानावर याचा परिणाम होत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहे. पहाटे, सायंकाळी आणि रात्री गारठा असला तरीही दुपारी मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. 



चक्रीवादळाचा परिणाम


प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) तमिळनाडूमधील 18 जिल्ह्यांसाठी शनिवार (16 नोव्हेंबर) आणि रविवार (17 नोव्हेंबर) साठी यलो अलर्ट जारी केला आहे. आरएमसीच्या निवेदनानुसार, कन्याकुमारी, थुथुकुडी, तिरुनेलवेली, रामनाथपुरम, तेनकासी, विरुधुनगर, मदुराई, थेनी, दिंडीगुल, शिवगंगा, पुडुकोट्टई, तंजावूर, तिरुवरूर, नागापट्टिनम, मायिलादुथुराई, चेपत्तुलम, चेपत्तुपुरम जिल्हा येथे मुसळधार पावसाची अपेक्षा आहे. शनिवार व रविवार दक्षिण तामिळनाडू आणि त्याच्या आसपासच्या भागात चक्रीवादळाच्या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडतो.