Maharashtra Weather Update : राज्याच्या वातारणात होणारे बदल सध्या चिंतेत भर टाकताना दिसत आहेत. कारण, एकिकडे उन्हाळ्याची सुरुवात होत असतानाच दुसरीकडे मात्र अवकाळीनं राज्यात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. ज्यामुळं थंडी कमी झाली असली तरीही ढगाळ वातावरण, कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हेसुद्धा वाचा : पनवेल मनपाच्या मालमत्ता कराचा मुद्दा चिघळला, सोमवारपासून सामाजिक कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण


विदर्भ आणि मराठवाड्याशिवाय बीड, हिंगोली, परभणी आणि अमरावतीमध्येही हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसानंतर राज्यातील तापमानात चढ उतार पाहायला मिळाला. काही जिल्ह्यांमधील तापमानानं 7 अंशांचा आकडा गाठला, तर कुठं कमाल तापमानाचा आकडा 38 अंशावर पोहोचला. सातत्यानं होणाऱ्या या हवामान बदलांचे राज्यातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होताना दिसत आहेत. 


दरम्यान, सध्या विदर्भापासून कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळं मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यावर पावसाळी ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. त्यातच देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र थंडीनं पुन्हा जोर धरला आहे. ज्यामुळं तिथून येणाऱ्या शीतलहरी मध्य प्रदेशापर्यंत परिणाम करताना दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.