Maharashtra Weather updates : (Monsoon Updates) राज्यात दाखल झालेल्या मान्सूननं मजल दरमजल करत आता बहुतांश जिल्हे व्यापण्यास सुरुवात केली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखल झाला असून, हळुहळू हे मोसमी वारे राज्यावर असणारी पकड आणखी मजबूत करणार असून, या धर्तीवर सिंधुदुर्गासह सातारा भागामध्ये वादळी पावसाचा इशारा आणि 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार शनिवारी (Vidarbha, Konkan) विदर्भासह उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही भागांवर पावसाचा शिडकावा झाला. मान्सूनच्या या हलक्या सरींमुळं शनिवारी पहाटेच्या वातावरणात अंशत: गारवा जाणवला. 


मान्सूननं गाठला कुठवरचा पल्ला? 


दुपारच्या वेळी जाणवणारा प्रचंड उकाडा आणि वातावरणातील एकंदर स्थिती पाहता मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून, आतापर्यंत या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगलीसह कोल्हापूर या भागांपर्यंत मजल मारली आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम


 



सिंधुदुर्गात वादळी वाऱ्यांचा अंदाज 


हवामान  विभागाचा अंदाज पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मस्त्य व्यवसायिकांना मस्य विभागाकडून महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानुसार 7 ते 11 जून दरम्यान समुद्रात 35 ते 45 किलोमीटर प्रतितास वेगाने वार वाहणार असून हा वेग 55 किमीपर्यंतही पोहोचू शकतो. त्यामुळे मासेमारीसाठी नौका घेऊन समुद्रात जाऊ नये. वादळी वाऱ्यांसह पावसाचं सुधरेपर्यंत जिल्हातील कोणत्याही नौका वादळी हवामानाच्या या कालावधीत समुद्रात जाणार नाहीत याबाबत खबरदारी घेण्यात यावी. नौका, जाळी, इंजिन आदी मासेमारी साधने सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.