Maharashtra Winter Session: महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुसऱ्या दिवशीही कामाजात सहभागी झालेले नाहीत. मागील 24 तासांपासून अजित पवार हे कोणालाही भेटलेले नाहीत. असं असतानाच अजित पवार कुठे आहेत याबद्दलची जोरदार चर्चा नागपूरबरोबरच महाराष्ट्रात रंगत असतानाच समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर रोख असल्याप्रमाणे सूचक विधान केलं आहे. आपल्या एक्स अकाऊंटवरुन त्यांनी केलेली पोस्ट ही अजित पवारांसाठी असल्याची चर्चा आहे.


नाराजी नाट्याची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार यांनी 5 डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी अजित पवारांच्या पक्षातील 9 आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या 9 आमदारांमध्ये ज्येष्ठे नेते छगन भुजबळ यांचा समावेश नाही. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज असल्याची जोरदार चर्चा असतानाच स्वत: भुजबळ यांनी नाराजी व्यक्त करताना आपल्याला कोणी विरोध केला हे आपण शोधत आहोत. प्रश्न मंत्रिपदाचा नसून ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली त्याचा असल्याचं भुजबळांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं. छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याने ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी अगदी रस्त्यावर उतरुन निषेध करण्यात आला. आजही बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर ओबीसी समाजाच्या वतीने आंदोलनाला करण्यात आलं. 


अंजली दमानियांची सूचक पोस्ट


या सर्व गोंधळादरम्यान अजित पवार हे अधिवेशनाच्या पहिल्या दिवासानंतर दुसऱ्या दिवसाच्या कार्यवाहीमध्येही सहभागी झालेले नाहीत. मागील 24 तासांपासून अजित पवार कोणाला भेटलेले नाहीत. त्यामुळेच अजित पवार कुठे आहेत यासंदर्भात दबक्या आवाजात चर्चा सुरु असतानाच अंजली दमानिया यांनी सूचक शब्दांमध्ये एक पोस्ट केली आहे. 'पुन्हा नॉट रिचेबल? वाह रे लोकशाही,' अशी पोस्ट केली आहे. दमानिया यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे. 



छगन भुजबळ कनेक्शन?


उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी सहभागी होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार उपस्थित नसल्यावरुन टोला लगावला आहे. "छगन भुजबळांचा रोष ओढावून घ्यायचा नसल्याने अजित पवार आले नसतील," असं विधान भास्कर जाधवांनी प्रसारमाध्यमांशमोर केलं. त्यामुळे खरोखरच अजित पवार हे भुजबळांच्या नाराजीमुळे समोर येत नाहीत की इतर काही कारण आहे याबद्दलची चर्चा दबक्या आवाजात नागपूरसहीत राजकीय वर्तुळात सुरु असल्याचं दिसत आहे.