महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक : संपूर्ण निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्र जिल्हा परिषद संपूर्ण निकाल
मुंबई : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणूक निकालाची सर्वांना उत्सुकता आहे. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीची सरशी होते की भाजपची हे या निकालातून स्पष्ट झाले आहे. खास करून नागपूरचा गड राखण्यात भाजपला यश आलेले नाही. तर धुळ्यात राष्ट्रवादीला दे धक्का देत भाजपने जोरदार मुसंडी मारली. तर पालघर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली असून माकपनेही सहा जागा जिंगल्या आहेत. राज्यात कोणाला किती जागा मिळाल्या आहेत, हे या निवडणूक निकालावरुन स्पष्ट होत आहे.
नागपुरात गडकरी-फडणवीसांना दे धक्का
राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम यात केवळ धुळ्यात भाजपला यश मिळाले. बाकी पाच ठिकाणी भाजपला पराभवाचा मोठा धक्का बसला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने जिल्हा परिषदांमध्येही भाजपची कोंडी करत धुव्वा उडाला आहे. विशेष म्हणजे भाजपचा गड असलेल्या नागपुरात विरोधकांनी एकत्र येऊन भाजपला धूळ चारली आहे. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि भाजपला समसमान २३ जागा मिळाल्या. पण काँग्रेससह महाविकास आघाडीचा विजय झाला. पालघरमध्येही महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा आहेत. वाशिम आणि अकोल्यात वंचित आघाडीने चांगली कामगिरी केली आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण ३३२ जागांपैकी भाजपला १०३ जागा मिळाल्या. मात्र महाविकास आघाडीमुळे भाजपला सत्ता राखता आलेली नाही.
पालघर : भाजपला फटका, शिवसेना-राष्ट्रवादीची मुसंडी
राज्यातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. नागपूर, धुळे, पालघर, नंदुरबार, अकोला आणि वाशिम या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. तर भारिप, माकप यांनी चांगले यश संपादन केले आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केली आहे. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने नागपुरात दमदार कामगिरी करताना भाजपला जोरदार झटका दिला आहे. पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीने भाजपला दणका दिला आहे. तर धुळ्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे.
धुळ्यात भाजपची मुसंडी
पालघर जिल्हा परिषद निकाल : ५७ जागा
शिवसेना : १८
माकपा : ५
भाजप : ११
राष्ट्रवादी : १६
काँग्रेस : १
बविआ : ४
मनसे : ०
अपक्ष : २
अकोला जिल्हा परिषद निकाल - ५३ जागा
शिवसेना - ११
भारिप - १९
भाजप - ५
राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - ३
अपक्ष - ४
नंदुरबार जिल्हा परिषद निकाल - ५६ जागा
काँग्रेस २३
भाजपा २३
शिवसेना ७
राष्ट्रवादी ३
अपक्ष - 00
नागपूर जिल्हा परिषद निकाल - जागा
एकूण जागा - ५८
काँग्रेस - ३०
राष्ट्रवादी - १०
भाजप - १५
शेकाप - ०१
शिवसेना - ०१
अपक्ष - ०१
वाशिम जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती
वाशीम जिल्हा परिषद निकाल : चार मुख्य पक्षांना मागे टाकत वंचित, जनविकास आघाडीने बाजी मारली आहे. या ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येथे कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आहे. याठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपने वंचित आणि जिल्हा जनविकास आघाडीला सोबत घेतले तर त्यांनाही सत्ता मिळू शकते. मात्र, कोण कुणाबरोबर जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भाजप - ७
शिवसेना - ७
वंचित - ९
राष्ट्रवादी - १०
काँग्रेस - ९
अपक्ष - २
जिल्हा जनविकास आघाडी - ७
स्वाभिमानी शेतकरी - १
धुळे जिल्हा परिषद निकाल - ५५ (१ निकाल राखीव)
भाजप - ३८
काँग्रेस - ४
शिवसेना - ३
राष्ट्रवादी काँग्रेस - ०
अपक्ष - १
- राखीव जागेचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे, पण तो राखीव ठेवण्यात आला आहे.
पंचायत समिती निवडणूक निकाल
अकोला पंचायत समिती निकाल - २० जागा
भारिप - १०
शिवसेना - ४
राष्ट्रवादी - १
भाजप - ३
काँग्रेस - ०
अपक्ष - २
मूर्तिजापूर पंचायत समिती निकाल - १४ जागा
भारिप - ६
शिवसेना - २
राष्ट्रवादी - ३
काँग्रेस - ३
धुळे - शिंदखेडा पंचायत समिती २० जागा
भाजप - १५
शिवसेना - २
काँग्रेस - १
राष्ट्रवादी - १
अपक्ष - १