Income Tax Raid in Nashik : नाशिकमध्ये आयकर विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. सलग सहा दिवस बांधकाम व्यावसायिकांवर छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले आहेत. तीन कोटीची रोकड आणि अडीच कोटींचे दागिने जप्त करण्यात आले आहे.


सरकारी अधिकाऱ्यांची बिल्डरकडे गुंतवणूक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक बाब म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी काळ्या पैशाची बिल्डरकडे गुंतवणूक करण्याचे समोर आले आहे. राजकारणी, अधिकारी आणि बिल्डर्समधील लागेबांधे उघड झाले आहे. आतापर्यंत आयकर विभागाची नाशिकमधीव बी मोठी कारवाई आहे. प्रशासनातील सुमारे दीड हजार अधिकारी, राजकीय नेते आणि बिल्डर्स यांचे लागेबांधे असल्याचे समोर आले आहे.


आयकर विभागाच्या हाती महत्त्वाचे कागदपत्र


कारवाईदरम्यान, आयकर विभागाच्या हाती महत्त्वाचे कागदपत्र लागले आहेत. चौकशीअंती अधिकाऱ्यांनी तीन कोटी रुपयांची रोकड आणि अडीच कोटी यांचे दागिने जप्त केले आहे. सलग सहा दिवस दोनशेहून अधिक राज्यस्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून ही चौकशी सुरु होती. या छापेमारीमुळे आयकरच्या रडारवर आता नाशिकचे बिल्डर्स आले आहेत. आयकर विभागाच्या अधिकारी छापेमारी सुरु केल्यानंतर नाशिकच्या बांधकाम क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अचानक रेड पडल्याने बांधकाम व्यवसायिकांना काहीही करता आलेले नाही. हे सर्व अधिकारी नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई येथील असल्याचे बोलले जात आहे. 



दरम्यान, नाशिकच्या आयकर विभागासह छत्रपती संभाजीनगर, ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर कार्यालयातील 225 अधिकारी आणि  कर्मचाऱ्यांचे पथक दिवस- रात्र ही कारवाई करत आहे. या पथकांनी बिल्डरांची 40 ते 45 कार्यालये, बंगले, फार्म हाऊसवर छापे टाकले. नाशिक शहरात ठिकठिकाणी छापासत्र सुरु असतानाच त्याच पथकातील काही पथकांनी इगतपुरी शहरात छापा टाकला. तेथील एका बड्या लॉटरी व्यावसायिकाकडे जवळपास 10 ते 15 अधिकाऱ्यांनी तळ ठोकून दिवसभर चौकशी केली. याच्या छाप्यात सुमारे 70 ते 80 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचे सांगितले जात आहे.