अलिबाग : Maharashtra cultural Festival in Karjat :रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळच्या एनडी स्टुडिओत 28 एप्रिल ते 1 मे या कालावधीत महाउत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला, क्रीडा, स्वाद, संस्कृती, व्यवसाय यांचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात विविध कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव उलगडले जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यभरातील 5 हजार शालेय विद्यार्थी रुबिक्स क्यूब सोडवून छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य प्रतिमा साकारणार आहेत आणि हा एक विश्व विक्रम ठरणार आहे. नामवंत कलाकार यात सहभागी होणार असून त्यांनी साकारलेल्या कलाकृतिदेखील पाहायला मिळतील. चित्रकार, शिल्पकारांची प्रात्यक्षिके देखील अनुभवायला मिळतील.


 छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचा जीवनपट उलगडणारे महाराष्ट्राचे राजे हे महानाट्य देखील सादर केले जाणार आहे. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, गानसम्राज्ञी लता मंगेशकर , रमेश देव यांना समर्पित विशेष कार्यक्रम देखील होईल. महाकला उपक्रमा अंतर्गत राज्यातील भारुड, धनगरी नृत्य, लावणी, जागरण , गोंधळ , आदिवासी कला सादर करण्यासाठी 100 हून अधिक कलाकार सहभागी होतील. 


चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कार्यक्रमांची रेलचेल असून प्रवेश सर्वांना विनामूल्य असणार आहे. या संदर्भात या महाउत्सवाचे आयोजक प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले आहे.