नागपूर : राज्यातील आमदारांना अच्छे दिन आले आहेत. आमदारांचा प्रवास भत्ता प्रति किलोमीटर ६ रुपयांवरून २० रुपये करण्यात आला आहे. त्यामुळे भत्त्यात घसघशीत वाढ झाली आहे. त्यामुळे आमदारांच्या पगारात मोठी वाढ होण्यास मदत झालेय. आता आमदारांचा पगार २,५८,१२० रुपये इतका पगार झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरात सुरु असलेल्या पावसाळी आधिवेशानात हे सुधारणा विधायक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान,   २०१६ मध्ये पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात एका विधेयकाद्वारे आमदारांचे आणि माजी आमदारांचे वेतन, भत्ते तसेच निवृत्तिवेतन एकमताने वाढविण्यात आले होते.


आमदारांच्या भत्त्त्यात वाढ करण्यासाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात होणारी वाढ , जनतेच्या कामासाठी, अधिवेशन, बैठकांसाठी फिरण्याचा खर्चाचा विचार करण्यातआला. यामुळे आमदारांच्या प्रवास भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले. 


आमदारांचा पगार किती?


महागाई भत्ता  ९१,१२० रुपये 
दूरध्वनी खर्च ८०,००० रुपये
संगणक चालकाचा पगार १०,००० रुपये
टपालासाठी १०,०००रुपये
मूळ पगार ६७,०००रुपये