Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. तर महाविकास आघाडीला अक्षरशः लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधीत केले. महाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. 50 वर्षातील हा सर्वात मोठा विजय असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचा जल्लोष साजरा केला आहे. 


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात सुशासन  विजयी झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील तरुण तसेच माता भगिणींचे आभार मानले.  महाराष्ट्राच्या विजयाने सर्व रेकॉर्ड मोडले. 50 वर्षातील हा सर्वात मोठा विजय आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. देशातील जनतेने भाजपवर विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्र हे देशातील सहावे राज्य आहे जिथे भाजप विजयी झाला आहे असे म्हणत  एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 


हे देखील वाचा.... शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार?


विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकत आपण मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलं. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला. त्याचवेळी राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला. या निवडणुकीत महाविकास आघाडीला अवघ्या 48 जागांवर समाधान मानावं लागलं. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 21 जागा जिंकल्या. तर काँग्रेसला वाट्याला 17 जागा आल्या आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा जिंकता आल्या. तर एकदा हाती सत्ता द्या असं आवाहन करणा-या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा जिंकता आली नाही. तर सत्तेत सहभागी होऊ असा दावा करणारे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला त्यांचा एकही उमदेवार जिंकून आणता आला नाही.