Eknath Shinde sends notice to Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) शिवसेना खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सोशल मीडियावर एकनाथ शिंदेंनी पाठवलेली नोटीस शेअर केली आहे. मात्र, चोराच्या उलट्या बोंबा म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या नोटीसची खिल्ली उडवलीये. मजेशीर राजकीय पत्र असा उल्लेख करत राऊतांनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फत संजय राऊत यांना ही मानहानीची नोटीस पाठवणयात आलीये. नेमकं प्रकरण काय पाहुया...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलंय?


सामनाच्या माध्यमातून बदनामीकारक बातम्या प्रकाशित करून, तुम्ही प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सामनाचे मुख्य संपादक आहात, तुम्ही भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली तुमच्या निहित राजकीय आणि स्वार्थासाठी तुम्हाला बदनामी करण्याची परवानगी नाही. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर पैसै वाटल्याचा आरोप केला होता, असं नोटीसमध्ये सांगण्यात आलंय. त्यामुळे तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा थेट इशारा नोटीसच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना दिलाय. 



सध्याची नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत मीडियासमोर बिनशर्त माफी मागण्यास सांगितलं जात आहे, असं न केल्यास माझ्या क्लायंटला तुमच्या आणि तुमच्या बातम्यांविरुद्ध फौजदारी आणि दिवाणी कार्यवाही सुरू करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा संजय राऊतांना देण्यात आलाय. अशातच आता यावर संजय राऊतांनी देखील भाष्य केलंय.


काय म्हणाले Sanjay Raut ?


50  खोके एकदम ओके, याला म्हणतात ऊलटा चोर कोतवाल को डाटे...! गैरसंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खूपच मनोरंजक आणि हास्यास्पद राजकीय डॉक्यूमेंट ही आहे, आता खरी मजा येणार, असं म्हणत संजय राऊत यांनी दंड थोपटले आहेत.