राज्यात सध्या कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे इतके डोस शिल्लक, आरोग्यमंत्र्यांची माहिती
आम्ही टेस्टींग कमी केलेल्या नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे अडीच लाख टेस्ट होत आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे खूप मोठ्या प्रमाणावर संक्रमीत रुग्ण सापडले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यातील काही भागात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्यात कोरोना केसेस कमी होऊ लागल्या आहेत. त्यात आज राज्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. महाराष्ट्राचा अँक्टिव्ह केसेसचा आकडा ७ लाखावरुन आता ४ लाखांवर आलाय आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र ग्रोथ रेटमध्ये 34 व्या क्रमांकावर आहे.
त्याच बरोबर टोपे यांनी स्पष्ट केले आहे की, आम्ही टेस्टींग कमी केलेल्या नाही. महाराष्ट्रात दहा लाख लोकांमागे अडीच लाख टेस्ट होत आहेत. आतापर्यंत 2 कोटी 2 लाख 31 हजार डोस दिले गेले आहेत.
लसींचे वाटप कसे?
कोविशिल्डचे 3 लाख आणि कोव्हॅक्सिनचे 2 लाख डोस शिल्लक आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या लसी या दुसऱ्या डोस घेणाऱ्यांसाठीच वापरणार असल्याचे, राज्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहोत. ते पुढे असे ही म्हणाले की, दुसरा डोस देऊन झाला की, आम्ही 45 वर्षांवरील लोकांना पहिला डोस देण्याचे कार्य सुरु करु.
लसींच्या अभावावर राज्य सरकारने ग्लोबल टेंडर काढण्याचे ठरवले आहे. त्यामुळे 25 तारखेपर्यंत हे टेंडर ओपन ठेवल्याचे टोपे यांनी सांगितले आहे. आतापर्यंत कोणत्याही कंपनीकडून आम्हाला प्रतिसाद आलेला नाही. टेंडर काढण्यासाठी केंद्र सरकारच्या काही परवान्याची गरज असते, कदाचीत त्यामुळे कंपन्या पुढे आलेल्या नसाव्यात. असे टोपे यांचे म्हणने आहे.
म्युकरमायकोसिसवर वक्तव्य
त्याच बरोबर ते महाराष्ट्रातील म्युकरमायकोसिसच्या सध्याच्या परिस्थितीवर म्हणाले की, महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे 1500 रुग्ण आहेत, यातील 500 रुग्णं बरे झाले आहेत. म्युकरमायकोसिसवर अम्पोटेरेफीन बी या इंजेक्शनची आता गरज आहे. हे इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना आपण ऑर्डर दिली आहे. परंतु कंपन्या पुरवठा करत नाहीत, कारण याचे नियंत्रण केंद्राने आपल्या हातात घेतले आहे. राज्यात याचे जास्त रुग्ण असल्याने राज्याला जास्त इंजेक्शन मिळावे अशी मागणी ही आम्ही केली आहे आणि याचे देखील जागतिक टेंडर काढले आहे. आम्ही उद्या पंतप्रधानांकडे या इजेक्शनबाबत व्हीसीद्वारे हा मुद्दा मांडणार आहोत."
म्युकरमायकोसिस या आजाराबद्दल राज्या सरकारने 9 पानांचे एक माहिती पत्रक डॉक्टरांना दिले आहे. यामध्ये कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असलेल्या लोकांना महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार करण्याचा लाभ दिला जाणार आहे. महात्मा फुले जनआरोग्य अंतर्गत 1 हजार रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार होतील. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत दीड लाख रुपयांपर्यंत उपचार होतात, परंतु शासन मात्र या आजारवर सगळा खर्च करणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले आहे. या आजारवरील सर्व औषधे, इंजेक्शन मोफत दिले जाणार आहे.
लॉकडाऊन बद्दल बोलताना टोपे म्हणाले सध्यातरी १ जूनपर्यंत लॅाकडाऊन कायम असणार आहे.