Balasaheb Thorat vs Nana Patole:  विधानपरिषद निवडणुकीत नागपूर आणि अमरावतीची जागा काँग्रेसनं जिंकली. त्यामुळं काँग्रेसची (Congress) पाळंमुळं अजूनही भक्कम असल्याचं चित्र दिसलं. मात्र नाशिक पदवीधरमध्ये सत्यजित तांबेंच्या (Satyajeet Tambe) उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आलाय. सत्यजित तांबेंच्या वतीनं आता त्यांचे मामा बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) दंड थोपटून मैदानात उतरलेत. नाना पटोले (Nana Patole) यांच्या विरोधातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

थोरातांनी थेट (Balasaheb Thorat) हायकमांडकडे नाराजीचं पत्र लिहिल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पटोलेंसोबत काम करणं अशक्य असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिल्याचं समजतंय. तर दुसरीकडं असं कोणतही पत्र (Balasaheb Thorat letter to highcomand) लिहिलं नसल्याचा दावा पटोलेंनी केला आहे.


पटोले आणि थोरात (Balasaheb Thorat vs Nana Patole) या दोघा ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वादामुळं काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, काँग्रेस श्रेष्ठींनी याची योग्य चौकशी करावी, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी (Prithviraj Chavan) व्यक्त केलीय.


आणखी वाचा - "रामदेव बाबाचं ऐकलं अन्...", Ajit Pawar यांचा किस्सा ऐकून भर सभेत पिकला हशा!


दरम्यान, नाना पटोलेंच्या एककल्ली कारभारामुळं आशिष देशमुखांसारखे अनेक काँग्रेस नेते नाराज आहेत. सत्यजित तांबे प्रकरण त्यांनी ज्या पद्धतीनं हाताळलं, त्यामुळं त्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो. पटोलेंच्या विरोधातील तक्रारींवर काँग्रेस हायकमांड (Congress High Command) काय निर्णय घेतं, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. दोन विधानसभा पोटनिवडणुकांच्या (Pune Bypoll) तोंडावर काँग्रेसमधली ही अंतर्गत नाराजी पक्षासाठी अडचणीची ठरू शकते.