Ajit Pawar upset On BJP : अजित पवार पुन्हा नाराज असल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीला गैरहजर होते. आजारी असल्याने अजित पवार बैठकीला आले नसल्याचं सांगण्यात आलंय. मात्र त्यामुळे सरकारमध्ये (Maharastra politics) आलबेल नसल्याची चर्चा पुन्हा सुरू झालीय. तसंच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये बिनसल्याची देखील माहिती सूत्रांनी दिलीय. छगन भुजबळांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर राष्ट्रवादीच्या सगळ्या मंत्र्यांनी फडणवीसांचीही भेट घेतली. पालकमंत्रिपदं न मिळाल्यानं राष्ट्रवादीचे मंत्री नाराज असल्याचं समजतंय. अजित पवारांच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे. 


देवगिरीवर नेमकं चाललंय काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांच्या देवगिरीवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे अजित पवारांच्या भेटीला गेले होते. तर अनिल पाटील देखील अजित पवारांच्या भेटीला देवगिरीवर गेले होते. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात नेमकं काय चाललंय? असा सवाल विचारला जात आहे. ट्रिपल इंजिनमधील एका नाराज इंजिनाने फडणवीसांची भेट घेतली, असं सूचक वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या होत्या.


अजित पवार जीएसटी कौन्सिल बैठकीस दिल्लीला जाणार नाहीत.  येत्या सात तारखेस बैठक दिल्लीत होत आहे, त्याला दीपक केसरकर बैठकीस जाणार असल्याची माहिती समोर आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झालेत. तर राज्यातील सध्याच्या परिस्थितीत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असची सूत्रांची माहिती दिली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.


भुजबळ म्हणता, हनिमून संपला नाही...


दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. बातमीत तथ्य नसल्याचं सांगत चादर झाकण्यात आली होती. मात्र, अजित पवार गटामध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर येतंय. अजित पवारांचा आजार राजकीय नाही. महायुतीचा हनिमून अजून संपला नाही, त्यामुळे नाराजीचा प्रश्न येत नाही, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.