Maharastra Politics : बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे? मनोज जरांगे स्पष्टच म्हणाले...
Maharastra Politics : बीड लोकसभेत पंकजा मुंडेंचा झालेल्या पराभवाला कारणीभूत कोण? या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत काय म्हटलंय? पाहा
Manoj Jarange On Pankaja Munde : लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव झाला. बीडमधील जातीय समीकरण पंकजा मुंडे यांच्या विरोधात गेलं, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे. उदयनराजे भोसले यांनी प्रचार करून देखील पंकजा मुंडे यांना मराठा मतांचा फटका बसल्याचं दिसून आलं. अशातच बीड मधील पंकजा मुंडेंचा पराभव कोणामुळे झाला? असा सवाल मनोज जरांगे यांना 'झी 24 तास'च्या मुलाखतीत विचारण्यात आला. तेव्हा जरांगे यांनी काय उत्तर दिलं? पाहा
काय म्हणाले मनोज जरांगे ?
आपण जेव्हा मोठ्या नेत्याचा वारसा चालवत असतो, तेव्हा जनतेची भावना समजून घेणं गरजेचं असतं. ज्यावेळेस जातीय तेढ निर्माण व्हायला लागला, आम्ही म्हणाल तसंच करा, असं म्हटलं तर मराठा समाज कसं ऐकेल? आम्ही कधी विरोध केला? आम्ही सांगितलं का कोणाला पाडा, आम्ही कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. समाजाचा निर्णय घेतला. आधी तुम्ही पडला नाहीत का? तुम्ही फक्त मराठ्यांना द्वेष देयला लागला, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.
पंकजा मुंडे यांच्या पराभवामागे जरांगे यांनी केलेलं आवाहन नाहीये का? असा सवाल जरांगेंना विचारला गेला. आमचं म्हणणं फक्त एवढंच होतं की, सरकारने आमची फसवणूक केली. यावेळेस ताकदीनं पाडा. मराठ्यांच्या मताला एकजूट दिसली पाहिजे. आपल्या मताची भीती वाटली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं होतं. मराठ्यांनी एकजुटीने मतदान केल्याने मराठ्यांच्या पोरगरिबाच्या पाया पडायला लागले.
पाहा Video
दरम्यान, आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या मोठ्या पदावर काम करतो, एखाद्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवतो तेव्हा भावनेच्या, जातीय द्वेषाच्या आहारी न जाता जनतेची भावना समजून घ्यावी लागते. जातीय तेढ निर्माण झाल्यास हे का झालं हे समजून घेणं त्यांचीही जबाबदारी आहे, असंही मनोज जरांगे यावेळी म्हणाले. आम्ही मोठ्या मनाने दिली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी ही आम्ही दिलेल्या वाख्येप्रमाणे व्हायला हवी अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं.