सातारा : महाविकासआघाडीमधल्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सहकार व पणन मंत्री तसंच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा कोविड-19 चा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाळासाहेब पाटील यांची काल कोविड -19 ची चाचणी करण्यात आली. त्यांचे  रिपोर्ट काल रात्री पॉझिटीव्ह आल्याने त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. 


बाळासाहेब पाटील याची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार सुरू आहेत. काळजी करण्याची गरज नाही, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज (बाबा)  पाटील यांनी दिली. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोविड-19 ची  टेस्ट करुन घ्यावी, शिवाय किमान आठवडाभर विलगिकरणात रहावं असे आवाहन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


याआधी महाविकासआघाडीमधल्या पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनाही कोरोनाची लागण झाली होती.