मुंबई : महाविकास आघाडीची बैठक नुकतीच संपली असून पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीचा खुलासा यावेळी करण्यात आला. केंद्र सरकारने भरघोस मदत देऊन महाराष्ट्र सरकार अपयशी ठरतंय असा आभास फडणवीसांनी निर्माण केल्याचे अनिल परब यावेळी म्हणाले. फडणवीस यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्याचा यावेळी खुलासा करण्यात आला. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आभासी पत्रकार परिषद घेतली. याला आम्ही प्रत्यक्षात उत्तर देतोय असे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान गरिब कल्याण योजनेच्या अंतर्गत गहू, तांदूळ, डाळ अशी केंद्राने मोठी निर्णय केली असे फडणवीसांनी सांगितले. पण १७५० कोटींचे गहू दिल्याचे त्यांनी सांगितले पण इतका गहू मिळाला नाही. 


१२२ कोटी स्थलांतरित मजुरांसाठी दिल्याचे ते म्हणाले, पण अजून धान्य निघाले नाही आणि मजूर गावाला पोहोचले देखील आहेत.


प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत ६००० देत होते. हे आधीच दिले होते.


विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक यांना ११६ कोटी केंद्राने दिल्याचे ते म्हणाले. पण १२१० कोटी राज्य सरकार देत हे त्यांनी सांगितले नाही.


६०० श्रमिक ट्रेन सुटल्या. या सर्व ट्रेनचे पैसे ६८ कोटी रुपये राज्य सरकारने दिले. कुठल्याही श्रमिकाकडून पैसे घेतले नाहीत.


८० ट्रेन दिवसाला मागितल्या आणि ३०-३५ ट्रेन दिल्याचे आम्ही म्हटले होते. याचा त्यांना राग आला. आम्ही ४८ ट्रेनची मागणी केली पण त्यांनी एका दिवसात ४३ ट्रेन पाठवल्या. लोकं जाऊच नयेत आणि सरकार बदनाम व्हावं हा केंद्राचा डाव आहे. 


आम्ही ट्रेन पाठवतो पण महाराष्ट्र सरकार मजुरांना जाऊ देत नाही असा खोटा आरोप केंद्राने केलाय. ट्रेनच्या वेळा उलटसुलट केल्या. १ तास आधी कळवलं जातं. गुजरातला १५०० ट्रेन दिल्या पण मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्राला ७०० ट्रेन दिल्या. 


महाराष्ट्र सरकारला एप्रिल आणि मेचा ३० टक्के कोटी हक्काचे पैसे मिळणे बाकी आहे.



देशाला जाणाऱ्या रिवेन्यूपैकी ३५ टक्के महाराष्ट्रातून जातो. इतर देशातील कामगार इथे मोठ्या प्रमाणात आहे. त्यांची व्यवस्थित काळजी घेतोय. आजही ७ लाख जेवणाची ताट त्यांच्यापर्यंत पोहोचवली जातात. दीड-दोन महीने घरात राहील्याने मानसिक अवस्था बिकट झाली आहे. त्यांना त्यांच्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. त्यांच्या तिकिटाचा, जेवणाचा खर्च आपण करतोय. कोरोनाचे संकट कमी झाले नाही. मुंबईची स्थिती काळजी घेण्यासारखी आहे. पण कोणाची गैरसोय होऊ नये याची काळजी घेतोय. 


विरोधी पक्ष म्हणून आम्ही सहकार्याची अपेक्षा केली होती. पण त्यांनी सरकार कसे पडेल याकडेच लक्ष दिले. पण आमचे लक्ष महाराष्ट्र कोरोनामुक्त करण्याकडे असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.