Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं एकतर्फी विजय मिळवलाय. महायुतीच्या विजयात काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. महायुतीच्या त्सुनामीनं महाविकास आघाडी नेस्तनाबूत झालीय. महायुतीच्या सुनामीच्या लाटेत अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांचा पराभव झाला. 


हे देखील वाचा.... शॉकिंग निकाल ! 65 टक्के मुस्लीम मतदार, विरोधात 11 मुस्लीम उमेदवार, तरीही प्रचंड मतांनी कसा बनला भाजपचा आमदार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराड दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय.  भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी चव्हाण यांचा सुमारे 39 हजार 355 मतांनी पराभव केला. भोसले यांना एक लाख 39 हजार 705 मतं मिळाली. तर पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख 150 मते मिळाली.


माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. यशोमती ठाकूर यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला आहे.
 गेल्या 40 वर्षापासून संगमनेर हा काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतील चेहरा मानला जाणाऱ्या बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ला. आठवेळा जिंकल्यावर नवव्या निवडणुकीत थोरातांचा धक्कादायक पराभव झालाय.


हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात चॅलेंजिंग प्रोजेक्ट! मुंबईतून पुण्याला जाताना खंडाळा घाट लागणार नाही


काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानण्यात येत आहे. आघाडीची सत्ता आली असती तर ते काँग्रेस पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. बाळासाहेब थोरातांचा एका नवख्या तरूणांनं  पराभव केलाय. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ यावेळी जायंट किलर ठरलेत. अमोल खताळ यांनी विजय मिळवत थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावलाय. 


काँग्रेसचे दिग्गज नेते चितपट


  • लातूर ग्रामीणमध्ये धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. भाजपचे रमेश कराड यांनी धीरज देशमुख यांचा पराभव केलाय

  • कसबा मतदारसंघातून भाजपच्या हेमंत रासने यांनी काँग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा पराभव केलाय. 

  • अक्कलकुवा मतदारसंघात भाजपचे अमश्या पाडवी यांनी विजय मिळवलाय. तर काँग्रेसचे के.सी.पाडवी पराभूत झालेत.

  • धुळे ग्रामीणमधून काँग्रेसचे कुणाल पाटील पराभूत झालेत

  • भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे पराभूत झालेत

  • काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा दिग्रस मतदारसंघातून पराभव झालाय

  • कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील पराभूत झालेत.