अमरावती : अमरावती जिल्हा परिषदेवर पुन्हा महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे प्रभावी नेते बबलु देशमुख तर उपाध्क्षपदी शिवसेनेचे विठ्ठल चव्हाण यांची बिनवीरोध निवड झाली आहे. गेल्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्याने काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र येत महाविकासआघाडी स्थापना केली होती. यावेळी तीच आघाडी कायम राहिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती जिल्हा परिषद 59 एवढी सदस्यसंख्या होती त्यापैकी दोन सदस्य बळवंत वानखेडे व देवेंद्र भुयार हे विधानसभेवर निवडून गेल्याने सध्या जिल्हा परिषदेत 57 सदस्य आहेत. बहुमतासाठी 29 सदस्यांची गरज होती. मात्र काँग्रेस 35 पेक्षा जास्त सदस्य संख्या जुळल्याने भाजपने निवडणुकीतून आधीच माघार घेतली.


निवडणूक बिनविरोध पार पाडण्यास काँग्रेसच्या नेत्यांना यश मिळालं. राज्यात आणि जिल्ह्यातही महावीकासआघाडीची सत्ता असल्याने जिल्ह्याचा विकास झपाट्याने होईल. अशी आशा महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी व्यक्त केली. तर मेळघाटचा विकासाची प्राथमिकता अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली.