Maharashtra Assembly Election CM Oath Ceremony : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे जवळपास ठरल्याचा दावा महायुतीकडून केला जातोय. पण महायुतीचं जर ठरलंय मग महायुतीचा मुख्यमंत्री जाहीर का होत नाही असा सवाल आता सामान्यांकडून विचारला जातोय. मुख्यमंत्री निवडीत आपला कोणताही अडथळा नाही असं सांगणाऱ्या शिवसेनेची आता थोडी भाषा बदललीय. भाजपनं खुशाल मुख्यमंत्री निवडावा असं मुख्यमंत्री सांगत नाहीयेत. मुख्यमंत्री अजून ठरायचा आहे. तीन नेते बसून मुख्यमंत्री ठरवू असं एकनाथ शिंदे सांगू लागलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेतेही आडून आडून मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेचा दावा आहे हे सांगायला विसरत नाही. पण शेवटी बोलताना मुख्यमंत्री दिल्लीतले नेते सांगतील ते असतील असंही सांगतात.


महायुतीतला तिसरा भागीदार असलेली राष्ट्रवादी मात्र अगदी स्पष्ट आहे. मुख्यमंत्री काहीही झालं तरी भाजपचाच होणार असं राष्ट्रवादी ठासून सांगतेय.


केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले तर निकालाच्या पहिल्या दिवसापासून आठवले भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं सांगतायेत. त्याचा त्यांनी पुन्हा पुनरुच्चार केलाय.


महायुतीत सगळं काही  अलबेल असेल पण मुख्यमंत्रिपदावरुन अलबेल आहे हे आता मात्र सांगता येणार नाही. ज्याअर्थी मुख्यमंत्रिपदाचं नाव जाहीर होत नाही त्याअर्थी भाजपच्या दाव्याला मित्रपक्षांपैकी कुणाचा तरी विरोध असल्याची चर्चा सुरु झालीय.