महायुतीच्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे. मात्र असं असलं तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. भाजप गृहखातं सोडायला तयार नाही आहे. तर शिवसेना गृहखात्यासाठी ठाम आहे..त्यामुळे भाजप-शिवसेनेतील गृहखात्याचा हा कलह शिगेला पोहोचलाय.. पाहुया त्यासंदर्भातलाच एक स्पेशल रिपोर्ट... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महायुतीतील 'गृह'कलह शिगेला?
गृहखात्यावरून शिवसेना अडून बसली
महाराष्ट्रातला 'गृह'कलह दिल्लीत सुटण्याची शक्यता



महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला आहे. मुहूर्त ठरला असला तरी गृहमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना दोन्हीही पक्ष गृहमंत्रीपदासाठी आग्रही आहेत. 'मुख्यमंत्रिपद भाजपकडे तर गृहमंत्रिपद आम्हाला पाहिजे असं सांगत शिवसेनेने पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केला आहे. 


महायुतीत गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. स्वतःच्या अनुभवावरुन गृहमंत्रीपद जेवढं चांगलं तेवढंच अडचणीचं असल्याचं सांगायलाही भुजबळ विसरले नाहीत.


भाजप आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्रिपद सोडणार नाहीत हे शिवसेना ओळखून आहे. त्यामुळंच गृहमंत्रिपदावर दावा ठोकून आणखी काहीतरी मोठं पदरात पाडून घेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न दिसतोय.