Mahila Samman Saving Certificate Yojana : केंद्र सरकारने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरु केली. महिलाना आर्थिक सक्षम करण्यासाठी ही योजना सुरु केली असून ही दोन वर्षे सुरु राहणार आहे. लहान बचत योजनांप्रमाणेच एक वेळची बचत योजना आहे. या योजनेद्वारे दोन वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाईल . महिला सन्मान बचत पत्र योजनेंतर्गत या योजनेत अर्ज करणार्‍या महिलांना 2 लाखांच्या बचतीवर 7.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे.  आता पोस्टात सुरुअसणारी ही योजना मोठ्या सरकारी बँकेतही सुरु करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना आता (Mahila Samman Savings Certificate (MSSC) सरकारी क्षेत्रातील बँक ऑफ इंडियामध्ये सुरु करण्यात आली आहे. या बँकेच्या सर्व शाखांमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र  मिळणार आहे. बँक ऑफ इंडियाला ही योजना राबविण्यास पहिला मान मिळाला आहे. दरम्यान, आणखी काही बँकेत ही योजना सुरु करण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत. यातमध्ये काही खासगी बँकांचा समावेश आहे. ICICI, Axis, HDFC आणि IDBI बँकेत हा गुंतवणुकीचा पर्याय लवकरच होणार आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाने अलीकडेच एक नोटीस जारी केल्यावर बँकेने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र सुरु केले आहे.


महिला सन्मान बचत योजना म्हणजे काय?


महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यंदाच्या अर्थसंकल्प 2023 मध्ये केंद्र सरकारने जाहीर केले आहे. ही योजना एप्रिल 2023 पासून देशातील सर्व 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.  ही बचत करणारी योजना आहे, ज्यामध्ये दोन वर्षांसाठी पैसे गुंतवले जाऊ शकतात. या योजनेत मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करता येईल.


महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. यामध्ये 7.5 टक्के व्याज दिले जाते आणि ते दर तिमाहीत गुंतवणुकीत जोडले जाते. तसेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणतीही महिला गुंतवणूक करु शकते. त्याचवेळी, अल्पवयीन मुलीचे खाते तिच्या पालकांच्यावतीने उघडले जाऊ शकते.


कमाल गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपये 


महिला सन्मान बचत योजनेत किमान 1,000 आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा 2 लाख रुपये आहे. या बचत प्रमाणपत्रावर TDS कापला जात नाही आणि आयकराच्या कलम 80C चा लाभही मिळतो. तसेच महिला सन्मान बचत प्रमाणपत्र बंद करण्याबाबत अतिशय कडक नियम करण्यात आले आहेत. ही योजना काही विशिष्ट परिस्थितीत बंद केली जाऊ शकते. जर एखादा खातेदार गंभीर आजाराचा बळी ठरला किंवा त्याच्या पालकाचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत सर्व कागदपत्रे दाखवून खाते बंद केले जाऊ शकते.


तसेच खाते उघडल्यानंतर 6 महिन्यांनंतरही ते बंद केले जाऊ शकते. मात्र त्यानंतर खातेदारांना केवळ 2 टक्के कमी व्याज दिले जाईल.