आशिष अंम्बाडे,  झी मीडिया, चंद्रपूर :  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागलीये ..सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचे समोर आले आहे. सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणीने तक्रारी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक महिलांना पैसे कट झालेचे मेसेज सुद्धा आले आहेत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत. अशा सूचना असताना ही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याचं समोर आल आहे.
सरकारने पैसे दिले पण बँकेने पैसे कट करून घेत असल्याचे अनेक लाडक्या बहिणीने तक्रारी केल्या आहेत. अनेक महिलांना पैसे कट झाले चे मेसेज सुद्धा आले आहेत. तर, काही बँकांकडून बहिणींना वेगळीच उत्तर दिले जात आहेत सरकारकडून सूचना असतानाही लाभार्थ्यांचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाहीत अशा सूचना असताना ही अनेक बहिणींच्या खात्यातले पैसे कट झाल्याच्या समोर आले आहे त्यामुळे अनेक बहिणींची निराशा झाली आहे. 


लाडकी बहीण योजनेत फसवणूक


लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय. एक बँक अकाऊंट 30 वेगेवगळ्या आधार कार्डशी जोडून लाडकी बहीण योजनेत फसवणूक केल्याचा आरोप होतोय... खारघरमधील महिला पूजा  महामुनी यांच्या आधारकार्डचा गैरवापर करून भामट्यानं फसवणूक  केलीय.  त्याची तक्रार पनवेल तहसीलदारांकडे करण्यात आलीय.. अर्ज वारंवार भरूनही दाखल होत नसल्यानं त्यांनी याची तक्रार स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांकडे केलीय.. त्यानंतर भामट्यानं फसवणूक केल्याचं समोर आलंय...साताऱ्यातील जाधव नावाच्या व्यक्तीनं पत्नीच्या नावे 1 नव्हे तर 30 अर्ज भरल्याचं समोर आलंय..