सातारा : राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हाहाःकार माजवला आहे.  पाटण तालुक्यातील दुसरी मोठी दुर्घटना समोर आली आहे. पाटण तालुक्यातील मिरगाव येथे भूस्खलन झाल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी आहेत. मिरगाव, कामरगाव या दोन ठिकाणी घरांवर दरड कोसळली आहे. दुर्गम ठिकाणी घटना घडल्यामुळे बचाव कार्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं NDRF ची टीम घटनास्थळी रवाना झाली आहे. गावातील जखमी लोकांना हेळवाक येथे बोटीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिह यांनी ही माहिती दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ढिगाऱ्याखाली आणखी नागरिक अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 



यापुर्वी तळई गावात मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये 35 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. रायगडच्या महाडमध्ये ही मोठी दुर्घटना घटली आहे. या दुर्घटनेत 40 जणं अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. तर आतापर्यंत 35 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येतेय.