जालना : Raid on Jalna Steel Industry : आयकर विभागाकडून मोठी कारवाई करताना एकदम फिल्मी स्टाईलने धाड टाकली. स्टील उद्योग, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांवर छापा मारला. यावेळी मोठी युक्ती लढवत अधिकारी चक्क लग्न वऱ्हाडी झालेत आणि त्यांनी धाड टाकली. यावेळी 200गाड्यांचा ताफा होता. त्यामुळे सुरुवातीला कोणाला शंका आली नाही. या धाडीत आयकर विभागाकडून 390 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आले. (Income tax raids on businessmen associated with 3 steel industries in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नाचे स्टिकर्स लावून आयकर विभागाच्या 200 गाड्या संभाजीनगरात दाखल झाल्यात. जालन्यातील आयकर विभागाचे संभाजीनगर कनेक्शन समोर आले. संभाजीनगरमधील एक केटरर आणि एका बिल्डरची चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 



जालना येथील स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर, घरं, कार्यालयांवर तसेच इलेक्ट्रॉनिक व्यावसायिकांच्या मालमत्तेवर आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागानं टाकलेल्या या छाप्यांमध्ये जवळपास 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आलीय. 


या छापेमारीतच काही दस्तावेज, 32 किलो सोने, 58 कोटी रुपयांची रोख रक्कम अशी एकूण 390 कोटी रुपयांची बेहिशेबी  मालमत्ता आयकर विभागाच्या हाती लागल्याने खळबळ उडाली आहे. 3 ऑगस्टला ही छापेमारी करण्यात आली. 


असा टाकला छापा


त्यादिवशी आयकर विभागाचे अधिकारी लग्न सोहळ्याचे स्टिकर लावलेल्या गाड्यांमधून छापा टाकण्यासाठी आले होते. या गाड्यांवर राहुल आणि अंजली... दुल्हन हम ले जायेंगे असे स्टिकर लावले होते. जवळपास 200 गाड्यांमधून 480 अधिकारी कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. सुरुवातीला जालनावासीयांना यासंदर्भात काहीही समजलं नाही. कुणाच्या तरी कार्यक्रमासाठी या गाड्या आल्या असाव्यात असं वाटत होते. त्यामुळे छाप्याची कुणाला शंका आली नाही. मात्र काही वेळात हे वऱ्हाडी नव्हे आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे स्पष्ट झाले.