खालापुरातील तेल कंपनीच्या गोदामाला भीषण आग, कोट्यवधींचे नुकसान
ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला रात्री उशिरा मोठी आग लागली.
रायगड : रायगडच्या खालापूर तालुक्यातील ढेकू गावातील तेल कंपनीच्या गोदामाला रात्री उशिरा मोठी आग लागली. या आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले मात्र कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ढेकु गावातील एसीपीएल लॉजिस्टीक कपंनीच्या गोदामाला ही आग लागली. आगीचे तांडव पाहुन भयभीत झालेल्या ग्रामस्थानी रात्र जागून काढली. 5 तासांच्या प्रयत्ना नंतर आग आटोक्यात आली आहे.
खोपोली नगरपालिका, एच ओ सी, एचपीसीएल, पाताळगंगा एमआयडीसी, रिलायन्स कंपनी अशा 5 अग्निशमन यंत्रणा तसेच खोपोली पोलीस आणि आयआरबी डेल्टाफोर्स या यंत्रणांनी चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग अटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.