गेल्या 50 वर्षांतील मोठे नुकसान, राज्यात 17 लाख हेक्टरवरील शेतीला फटका
Major loss in Maharashtra : आताच्या घडीची मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी ( farmers) महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 17 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे.
नागपूर : Major loss in Maharashtra : आताच्या घडीची मोठी बातमी. शेतकऱ्यांसाठी ( farmers) महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 17 लाख हेक्टरवर शेतीचे नुकसान झाले आहे. गेल्या 50 वर्षांतले सर्वात मोठे नुकसान झाले आहे. ( farmers in crisis) मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भात हे नुकसान झाले आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या मदतीसंदर्भात नागपुरात ते बोलत होते. पंचनामे करुन तात्काळ मदत करणार, असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. (Major loss in last 50 years in Maharashtra, hitting agriculture on 17 lakh hectares - Vijay Vadettiwar)
गेल्या पाच-सहा दिवसांपासून बरसणा-या मुसळधार पावसाचा अमरावती जिल्ह्याला फटका बसला आहे. घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. तर दुसरीकडे शेतातील उभी पिकंही भुईसपाट झाली आहेत. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यातील 20 हजार हेक्टर शेती खराब झालीये. तर 369 घरांची पडझड झाली झाली आहे. दर्यापूर, धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, वरुड, मोर्शी, अंजनगाव सुर्जी या तालुक्यातील शेतीचं मोठं नुकसान झाले आहे.
विमा कंपन्यांचा शेतकऱ्यांना फतवा, अब्दुल सत्तार संतापलेत
विमा कंपन्यांच्या (insurance companies) फतव्याने शेतकरी (farmer ) अक्षरक्ष: खचला, असे वृत्त प्रसिद्ध करताच सरकारने याची दखल घेतली आहे. विमा कंपन्या या शेतकऱ्यांचे रक्त पिणा-या खटमल आहेत, विमा कंपन्या मोठ्या झोल आहेत, अशा शब्दात महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी विमा कंपन्यांचे वाभाडे काढलेत. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून, शेतकऱ्यांची मदत करू असे सत्तार म्हणालेत.