अजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय
तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. लवरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
Maharashtra Cabinet Expansion: सलग तिस-यांदा नरेंद मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदींसोबत 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभाराचे राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री अशी एकूण 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन कॅबिनेट तर चार राज्यमंत्रिपदं आली आहेत. सात खासदार असूनही शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेले नाहीच. तर एकही खासदार नसताना आठवलेंना पुन्हा राज्यमंत्रीपद मिळाले आहे. मात्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदाराला मात्र मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. यावरुन अजित पवार नाराज आहेत. अजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रीमंडळ विस्ताराची घोषणा केली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने महायुतीतील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने सरकारने तयारी केली आहे. यावेळी तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. रस्त्यांप्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तर जाता जाता काहींना खूश करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज आमदार, खासदारांची बैठक होणार आहे. येणा-या विधानसभा निवडणुकीत कसे सामोरे जायाचे, कोणत्या मुद्यावर लक्ष केंद्रित करायचे यावर चर्चा केली जाणार आहे...तर लोकसभेत किती मतदान कोणाला झाले याचादेखील आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय...लोकसभेप्रमाणे विधानसभेला उमेदवारी उशीरा घोषित न करता लवकर उमेदवारी घोषित करण्यासाठी तयारी सुरू आहे...तसंच विधानसभेला खासदारांची कशी मदत होईल याचंही प्लानिंग केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय.
तर, दुसरीकजे शिवसेना भवनात उद्धव ठाकरे गटाची महत्त्वाची बैठक सुरूये....उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत प्रमुख नेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार यांची बैठक होते...या बैठकीत लोकसभा निवडणूक आढावा आणि विधानसभेची तयारी याविषयी चर्चा केली जातेय. .बैठकीसाठी अनिल देसाई, आदित्य ठाकरे, संजय राऊत,विनायक राऊत, प्रियांका चतुर्वेदी, सचिन अहिर दाखल झालेयत...