मुंबई : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहीत यांच्या आता कलम ३०२ म्हणून खुनाचा खटला चालणार आहे. तर राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रेंवर अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी खटले चालणार आहे. श्याम शाहू, प्रविण टक्कलकी, शिवनारायण कालसंग्रा यांना दोषमुक्त करण्यात आलंय.







COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एनआयए कोर्टाने हा फैसला दिला आहे. विशेष एनआयए कोर्टाने पुरोहित, साध्वी, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी आणि सुधाकर द्विवेदी या पाच जणांवरील मोक्का हटवलाय. त्यामुळे या सगळ्यांवर आता बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याखाली खटला चालणार आहे. 


राकेश धावडे आणि जगदीश म्हात्रेंवर अवैध हत्यारं बाळगल्याप्रकरणी खटले चालणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी १५ जानेवारीला होणार आहे. मालेगाव स्फोटातील आरोपी याआधीच जामीनावर सुटलेत. २९ सप्टेंबर २००८ रोजी झालेल्या मालेगाव स्फोटात सात जणांचा बळी गेला होता.