प्रथमेश तावडे, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mumbai Local Train News: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन मानली जाते. गेल्या काही दिवसांपासून लोकलमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. सीटवरुन प्रवाशांची हाणामारी  ते लोकलमध्ये साजरे केले जाणारे सण यामुळंही लोकल चर्चेत असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लोकलमध्ये भयंकर प्रकार घडत असल्याचे उघडकीस आले आहे. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


मुंबईची लाइफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये अमली पदार्थाचे सेवन केले जात असल्याचे समोर आले आहे. लोकल ट्रेनच्या माल डब्ब्यात काही जण ड्रग्सचे सेवन करत असल्याचा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


व्हायरल झालेल्या व्हिडिओत, दोन इसम माल डब्यात गर्दी असतानाही ड्रग्जचे सेवन करत असल्याचे दिसून येत आहे. यातील एक व्यक्ती ट्रेनच्या सीटवर बसलेला आहे तर एक जण खाली बसला आहे. मोबाइलवर ड्रग्स घेऊन एक जण त्याचे सेवन करत आहेत. यावेळी डब्यात इतर प्रवाशीही आहेत. माल डब्यात उपस्थित असलेल्या एका प्रवाशानेच हा प्रकार व्हिडिओत कैद केला आहे. यात दोघांचेही चेहरे स्पष्ट दिसत नाहीयेत.


या घटनेमुळं प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्रीच्या वेळी ही घटना असल्याचे बोलले जात आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार,  चर्चगेट विरार लोकल ट्रेन मधला हा प्रकार असून हे इसम 1 सप्टेंबरला रात्री दीड वाजता नालासोपारा रेल्वे स्थानकात उतरल्याची माहिती प्राप्त होतं आहे. दरम्यान, वसई रेल्वे पोलिसांना या प्रकारबाबत विचारणा केली असता आम्हीदेखील याबाबत तपास करत असल्याची माहिती  दिली आहे. मात्र या प्रकारामुळे रेल्वेतून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जातं आहे


व्हायरल व्हिडिओत दिसणारे हे तरुण नेमके कोण आहेत. याचा शोध पोलिसांकडून घेतला आहे. तसंच, व्हिडिओचीही चौकशी करण्यात येत आहे. अद्याप या तरुणांना अटक करण्यात आलेली नाहीये. 



दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये तरुणी दाराला लटकत प्रवास करत होती. अगदी एका पायावर उभी असलेल्या या तरुणीचा हा जीवघेणा प्रवास पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली होती.