अकोला : कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी संपूर्ण  जग एक होवून काम करत आहे, तर दुसरीकडे अकोल्यात माणुसकीला काळिमा फासणारी  घडना समोर येत आहे. चक्क कोरोना व्हायरसच्या भितीने मुलाने आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली आहे. त्यानंतर मुस्लिम बांधवांकडून कोरोनामुळे मृत पावलेल्या वडिलांना मुखाग्नी देण्यात आला आहे. हिंदू पद्धतीने या मुस्लिम सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. या बातमीची चर्चा सध्या अकोल्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महापालिकेचे स्वच्छता अधिकारी प्रशांत राजूरकर यांनी ते सांगितले, दोन दिवसांपूर्वी कोरोनाच्या संसर्गामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. कागदी कारवाईनंतर प्रशासनाने मृतांच्या कुटुंबियांना माहिती दिली. परंतु मृतदेह घेण्यासाठी कुटुंबातील एकही सदस्य रुग्णालयात फिरकला नाही. 



ज्या वडिलांनी जन्म दिला, मुलाला लाहनाचं मोठं केलं त्याच वडिलांच्या अंत्यसंस्काराकडे वंशाच्या दिव्याने पाठ फिरवली आहे. मुलाने वडिलांचं अंत्यदर्शन देखील नसल्याचं राजूरकर म्हणाले. त्यांनंतर माणुसकी धर्म जपत जावेद नावाच्या मुस्लिम व्यक्तीने मृतदेहास मुखाग्नी दिला. 


दरम्यान, मृत व्यक्तीचा मुलगा नागपूरमध्ये राहतो. वडिलांना कोरोना झाल्याची बातमी कळताच तो अकोल्यात आला. पण रुग्णालयात गेलो तर आपल्याला देखील कोरोनाची लागण होईल या भितीने त्याने वडिलांच्या अंत्यसंस्काराकडे पाठ फिरवली.