शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर :  लातूर तालुक्यातील मुरुड येथे पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना घडली आहे. विशेषबाब दुष्कृत्य पीडित मुलीच्या वडिलांच्या मित्रानेच केल आहे.  मुरुड शहरातच राहणार अक्षय महावीर बीडकर असे या २३ आरोपीचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित कुटुंबाच्या घरी बालपणापासून येणाऱ्या या आरोपीच्या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय.शाळेतील शिक्षकांना सांगून मारायला लावतो असा धाक दाखवून चिमुरडिवर बलात्कार केला.  या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात कलम ३७६ नुसार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी अक्षय महावीर बीडकर याला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास मुरुड पोलीस करीत आहेत.


कुटुंबात अक्षयबाबत अतिशय विश्वासाचे नाते होते. रविवारी रात्री साडेआठ वाजता अक्षय मित्राच्या घरी गेला. यावेळी मित्राची पाचवर्षांची मुलगी आणि मुलगा खेळत होते. घरातील बहुतेक लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. याचाच फायदा आरोपी अक्षयने घेतला.


खोलीचा दरवाजा बंद करून शाळेतील शिक्षकांकडून मारायला लावेन अशी धमकी देऊन पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केली. दोघंही मुलं ओरडू लागली. मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आई खोलीकडे धावत आली. 


दरवाजा वाजवल्यानंतर आतमधून आरोपी अक्षय हा मुलांसह कडी उघडून बाहेर आला. त्यावेळी नेमका प्रकार काय घडला हे मुलीच्या आईच्या लक्षात आलं नाही. सोमवारी सकाळी मुलगी झोपेतून उठल्यानंतर रडू लागली. 


थोडी विचारपूस केल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईसह साऱ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. स्वतःला सावरत मुलीच्या आईने मुलीला घेऊन पोलिस स्टेशन गाठलं. घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत अक्षयला अटक केली. अक्षय विरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.