वैभव बालकुंदे, झी मिडीया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Deadbody Found In Pond Latur: लातूर (Latur) जिल्ह्यातील लेंडेगाव गावात एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे, गावात असलेल्या पाझर तलावात काही मुलं पोहण्यासाठी उतरले असताना मुलांना एक मानवी सांगाडा सापडला आहे. गावात मानवी सांगाडा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Crime News In Marathi)


तलावात हाडांचा सांगाडा


लातूर जिल्ह्यातील लेंडेगाव येथील पाझर तलावाच्या शेजारी मानवी कवटी, पायांची हाडे आणि कपडे सापडले आहेत. तलावात काही मुलं पोहण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत किनगाव पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. तसंच, पुढील तपास पोलिस करत आहेत. 


चार महिन्यांपासून बेपत्ता


पोलिसांनी याबाबत दिलेली माहिती अशी की, लेंडेगाव गावातील तरुण चार महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेतला जात होता. मात्र, त्याच्याबाबत त्याचा शोध लागत नव्हता. त्यामुळं त्याच इसमाचा हा हाडाचा सापळा असावा, असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 


पोलिसांकडून शोध सुरू


दरम्यान, पोलिसांनी तलावा शेजारी सापडलेला हाडांचा सापळा शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील तपास करणं सोप्प जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब खंदारे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. 


मुंब्र्यातही सापडला मृतदेह


ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. कपड्यात गुंडाळून सेलो टेपने हा मृतदेह पॅक करण्यात आला होता. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नाहीये. स्थानिक लोकांना प्रथम हा कचरा असल्याचे वाटले. मात्र, त्यातून दुर्गंध आल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी घेऊन पाहणी केली असता त्या कपड्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृत महिलेचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. 2 ते 3 दिवसांपूर्वी महिलेची हत्या करण्यात आल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


इमारतीवरुन पडून मृत्यू


ठाण्यातील पाचपखाडीमधील आनंद सावली बिल्डीगमध्ये २४ व्या मजल्यावरुन पडून एका व्यक्तीचा दुर्देवी मुत्यू झाल्याची घटना घडलीय. आनंद सावली सोसायटीमध्ये राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांच्या घरी आलेल्या एका व्यक्तीचा मुत्यू झाल्याने एकच खळबळ माजली आहे.