पुणे : सेल्फी स्टीकच्या मदतीने शेजारी राहणा-या जोडप्याच्या खाजगी क्षणांना रेकॉर्ड करण्याचं प्रकरण पुण्यात समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका मोठ्या कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्लॅनिंग मॅनेजरवर हा आरोप लावण्यात आला असून तक्रार दाखल केल्यापासून तो फरार आहे. आरोपीने या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून महिलेला ब्लॅकमेल केल्याचं उघड झालं आहे. 


बेडरूममधील खाजगी क्षण रेकॉर्ड


पुणे मिररने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेचा खुलासा झाल्यानंतर २४ नोव्हेंबरला पीडित जोडप्याने हिंजेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शेजारी कुंदन अश्ते विरोधात तक्रार दाखल केली. या जोडप्याने आरोप केलाय की, कुंदनने फोन कॅमेरा आणि सेल्फी स्टीकच्या मदतीने बेडरूममधील खाजगी क्षण रेकॉर्ड केले आणि नंतर ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियात शेअर करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केले. गेल्या तीन महिन्यांपासून तो असं करत असल्याचा आरोप आहे. 


शारिरीक संबंधाची मागणी


पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, अश्तेने महिलेला तिची क्लिप पाठवली आणि ब्लॅकमेल करत त्याच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यास सांगितले. अश्तेने धमकी दिली की, तिने तसे केले नाही तर तो ती क्लिप सोशल मीडियात अपलोड करेल. 


व्हिडिओ काढताना पकडले रंगेहात


हिंजेवाडी पोलीस स्टेशनचे इंचार्ज रंगनाथ उंडे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्यात हे दोघे बेडरूममध्ये होते आणि तेव्हाच त्यांना खिडकीबाहेर काहीतरी विचित्र दिसले. ते खिडकीजवळ गेले असता त्यांना कुंदन फोन सेल्फी स्टीकवर लावून रेकॉर्ड करत असल्याचे दिसले. त्यानंतर सोसायटीच्या इतर सदस्यांना सोबत घेऊन तक्रारदारांनी कुंदनला याबाबत जाब विचारला तर त्याने तो गेल्या तीन महिन्यांपासून हे करत असल्याचं मान्य केलं.


आरोपी फरार 


दरम्यान, अश्ते विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र प्रकरण उघड झाल्या दिवसापासूनच तो फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.