प्रेमभंगामुळे १५ पानी पत्र लिहून तरूणाची पुण्यात आत्महत्या
आत्महत्या करण्यापापूर्वी त्याने अक्षयने सुमारे १५ पानी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आई, वडील आणि भावाची माफी मागितली आहे
पुणे: एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने पुण्यातील हडपसरमध्ये असलेल्या अमनोरा परिसरात एकच खळबळ उडाली. अक्षय अखिलेश्वर कुमार असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. प्रेमात अपयश आल्याने गेले काही काळ तो तणावात होता. या तणावातूनच त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
व्यवस्थापन शास्त्र शाकेचा विद्यार्थी
प्राप्त माहितीनुसार अक्षय हा मगरपट्टा येथील आयबीएस महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. या महाविद्यालयात तो व्यवस्थापन शास्त्र शाखेत शिक्षण घेत होता. गेले काही दिवस तणावत असलेल्या अक्षयने आपल्या राहत्या घरी दोरिच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी घडली.
कुटुंबियांची मागितली माफी
दरम्यान, आत्महत्या करण्यापापूर्वी त्याने अक्षयने सुमारे १५ पानी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने आई, वडील आणि भावाची माफी मागितली आहे. पोलीसांनी हे पत्रही ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे.