BJP Pandal Collapse : अमरावतीमध्ये (Amravati) भाजपच्या (BJP) कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळ्याचा प्रकार समोर आला आहे. मंडप कोसळल्यानंतर भाजपचे अनेक नेते त्याखाली अडकले होते. त्यानंतर भाजपचे खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रविण पोटे हे मंडपाखाली अडकले होते. यानंतर सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर नितेश राणे (Nitesh Rane) थोडक्यात बचावले आहेत. या दुर्घटनेनंतर कार्यक्रमस्थीळ एकच खळबळ उडाली होती.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अमरावतीच्या नांदगाव पेठ एमआयडीसी येथे भाजपच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांच्या कार्यक्रमाचा मंडप वादळी वाऱ्यामुळे उडून गेला आहे.  या कार्यक्रमाला भाजपा खासदार अनिल बोंडे, आमदार नितेश राणे, आमदार प्रवीण पोटे सह भाजप नेते उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यानच मंडप कोसळ्याने सर्वच नेते मंडपाखाली अडकले होते.

शुक्रवारी भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान अंतर्गत नांदगाव पेठ एमआयडीसी मधील टेक्सटाईल्स पार्कमध्ये शुक्रवारी विकासतीर्थ या औद्योगिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचवेळी हा सर्व प्रकार घडला. कार्यक्रमादरम्यानच अचानक सुसाट वारा आल्यामुळे संपूर्ण मंडपच खाली कोसळला. त्यानंतर या मंडपा खालून नितेश राणे,अनिल बोडे यांच्यासह भाजप नेत्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.  मात्र मंडप खाली कोसळल्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला होता.

आम्ही पवार साहेबांची काळजी नक्की घेऊ - नितेश राणे

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याबाबत बोलताना आम्ही शरद पवार यांची काळजी घेऊ असे नितेश राणे यांनी म्हटलं आहे. "शरद पवार यांच्याशी आमचा वैचारिक विरोध असला तरी त्यांना राज्यात काहीही त्रास होणार नाही. एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. हे उद्धव ठाकरेंचे सरकार किंवा महाविकास आघाडीचे सरकार नाही. आम्ही काही उद्धव ठाकरेसारखे घरी बसून राज्याचा कारभार चालवत नाही, महाविकास आघाडी सरकारच्या काळातही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली होती. मात्र आम्ही असे करणार नाही," असे नितेश राणे म्हणाले.