नवी मुंबई : यंदाच्या मोसमातली देवगड हापूस आंब्याची पहिली पेटी वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालीय. साधारणपणे आंब्याची पहिली पेटी बाजारात यायला जानेवारी महिना उजाडतो. पण यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातच आंबा आल्यानं शेतकरी आणि व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या प्रकाश शिर्सेकर यांच्या बागेतून हा हापूस आंबा मुंबईत आलाय. प्रशांत राणे या घाऊक आंबा व्यापा-याकडं ही पेटी आल्यानंतर तिची विधीवत पूजा करण्यात आली. यंदाचा आंब्याचा हंगाम शेतकरी आणि व्यापा-यांसाठीही चांगला जावा, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. शिर्सेकरांच्या बागेत गेल्या जुलैमध्येच आंबा मोहोर धरला होता. अवकाळी पावसापासून मोहोर वाचवत, शिर्सेकरांनी आंब्याचं फळ लवकर घेतलं.