Manoj  Jarange :  मनोज जरांगे यांची नवी रणनीती पहायाला मिळणार आहे.  100  मतदारसंघात मराठा समाजाचे उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. आगामी निवडणुकीत मराठा आंदोलनाचा मोठा फटका महायुती आणि महाविकासआघडीला बसण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगेंच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या वतीने विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापर्यंत 100 मतदारसंघाची चाचपणी करण्यात आलीय...अशी माहिती सूत्रांनी दिलीय..यात गेल्या 10 वर्षांपासून मराठा आमदार विजयी झालेले मराठा मतांचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात येत आहे...तर पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, जालना ,बीड, धाराशिव जिल्ह्यातील काही मतदार संघाची चाचपणी करण्यात आलीय. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशाार 


मराठा आणि कुणबी हा एकच असून, नोंदी मिळालेल्यांना आरक्षण द्या...अशी मागणी जरांगेंनी केलीय...तर सगेसोयरेसंदर्भात वाशीत उधळलेल्या गुलालाचा अपमान करू नका...नाहीतर विधानसभा निवडणुकीत तुमच्यावर गुलाल रुसेल असा इशारा मनोज जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय... 


राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटलांची फसवणूक केली, असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलाय. ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी पुण्यातील मोदी बागेत शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांच्या भेटीनंतर त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. सर्व समाजात जातीय सलोखा असावा. तेढ निर्माण होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचं निंबाळकर म्हणाले.


लोकसभा निवडणुकीत भाजपला मनोज जरांगे फॅक्टरचा फटका


लोकसभा निवडणुकीत भाजपला काही प्रमाणात मनोज जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याची कबुली भाजप नेते भागवत कराड यांनी दिली. ते अकोल्यात लोकसभेच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर बोलत होते. तसंच संविधान धोक्यात या काँग्रेसच्या खोट्या दाव्याचाही भाजपला फटका बसल्याचं कराड म्हणाले.