NCP MLA from Ajit Pawar : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.. अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीलाही 5 आमदारांनी दांडी मारलीय.. त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांना पुन्हा घरवापसीचे म्हणजे शरद पवारांच्या पक्षात जाण्याचे वेध लागलेत का याचीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार... शरद पवार... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ते विजयानंतर जोरदार घोषणाबाजी करत आहेत. कारण लोकसभा निकालात शरद पवारांच्या पक्षाने 10 जागा लढवून 8 जागांवर विजय मिळवला आहे. पवारांच्या या विजयी स्ट्राईकनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातत पुन्हा मोठा भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळाता रंगली आहे. कारण अजित पवार गटातल्या आमदारांना परतीचे वेध लागले असल्याची चर्चा रंगली आहे. अजित पवार गटातील अनेक जण शरद पवारांकडे परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. 


लोकसभा निकालानंतर अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांनी सुप्रिया सुळेंना अभिनंदनाचा मेसेज पाठवल्याचीही माहिती आहे. घरवापसीसाठी अजित पवार गटाचे आमदार प्रयत्न करत असल्याचा दावा रोहित पवारांनीही केला आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रातले दोन आमदार शरद पवारांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.  अजित पवार गटातून एक आणि काँग्रेसमधून एक असे दोन आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत असल्याचं समजते. 


राज्यातली परिस्थिती मविआला अनुकूल असल्याने शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय आमदारांनी घेतल्याचं समजतंय. तेव्हा लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
पक्षात आऊटगोईंग होणार असल्याच्या चर्चेनंतर अजित पवारही अॅक्शन मोडवर आलेत. आपल्या आमदारांच्या त्यांनी बैठकाही घेतल्यात. मात्र, लोकसभा निकालात झालेला पराभव, शरद पवारांना मिळालेलं यश, त्यामुळे आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचं मोठं आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे.