बीडमध्ये नद्यांचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांना स्थलांतर
जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. जिल्ह्यातल्या बिंदुसरा, तलवार या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहे.
बीड : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलं आहे. जिल्ह्यातल्या बिंदुसरा, तलवार या मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहे. नद्यांचं पाणी गावात शिरल्यानं अनेकांना स्थलांतर करावं लागलं आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मांजरसुंबा, पाली, कोळगाव, कपिलधार या भागात मुसळधार पाऊस झाल्यानं नदीला पूर आला आहे. काल आष्टी तालुक्यातील देवळाली पानांची गावात पूराचं पाणी शिरलं आहे. यामुळे गावातल्या अनेकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. पूरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. डोकेवाडा साठवण तलाव ओव्हरफलो झाला आहे. बिंदुसरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे.