मुंबई : निसर्ग चक्रीवादळ अवघ्या काही मिनिटांमध्ये अलिबागच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. या चक्रीवादळाचे परिणाम राज्याच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे. समुद्र खवळलेला आहे तर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस देखील कोकणात पडत आहेत. रत्नागिरीमध्ये वादळी वाऱ्यामुळे झाडं जमीनीवर उन्मळून पडलीआहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या संकटाचा  सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं  सांगितले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून किनारपट्टीलगत राहणाऱ्या रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. शिवाय ज्या समुद्रकिनाऱ्यालगत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याठिकाणी एनडीआरएफची पथकं देखील तैनात करण्यात आली आहे. 



या चक्रीवादळाचे परिणाम मुंबई किनारपट्टीलगतही दिसून येणार आहेत.  ताशी १०० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहतील अशी माहिती देण्यात आली आहे. एनडीआरएफच्या तुकड्यायही मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी अशा भागांमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. हे निसर्ग चक्रीवादळ १ ते ३ वाजण्याच्या दरम्यान किनारपट्टीवर धडकणार असल्याचं सांगितले जात आहे.


दरम्यान देशात कोरोनाचं वादळ अद्यान शमलेलं नाही, त्यात निसर्ग चक्रीवादळ हे नवं संकट महाराष्ट्रासमोर उभं राहीलं. या संकटाला सामोरे जाण्यासाठी  प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे. या वादळाचा मोठा फटका अलिबाग किनारपट्टीला लगणार आहे. शिवाय मुंबईत देखील वादळाचे परिणाम पहायला मिळत आहेत. राज्यात हलका ते मध्य स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.